icon back to all Videos

चित्रकार चित्रा वैद्य ह्यांची गिरगाव स्केचेस

नमस्कार मी चित्रा वैद्य. मी आर्टिस्ट आहे. मला जुन्या वास्तू किंवा हेरिटेज या विषयावर चित्र काढायला आवडतात. मी आतापर्यंत भारतातील अनेक हेरिटेज structures ची स्केचेस आणि पेंटिंग्ज केली आहेत. मुंबईमधील गिरगाव या भागातील जुन्या इमारतींची स्केचेस मी केली आहेत. ही स्केचेस अनेकांना आवडली आहेत आणि यातील बरीच चित्र आर्ट कलेक्टर्सच्या संग्रही आहेत.
आता नुकतंच मी केलेलं गिरगावच स्केच आपण बघू. या चित्रासाठी मी पेन आणि इंक हे माध्यम वापरले आहे, आणि खास स्केचिंग साठी वापरण्यात येणारा acid free Archival Paper वापरला आहे. माझं बालपण गिरगावमध्ये गेलं . गिरगांवच्या माझ्याकडे खूप सुंदर आठवणी आहेत. तिथल्या गल्ल्या, चाळी, मंदिरं, वाड्या, गणेशोत्सव, खोताच्या वाडीतली पोर्तुगीज ढंगातली घरं, हे विषय मला चित्रांसाठी आवडतात. मी आता गिरगावच्या विषयावरती नवीन सिरीज करते आहे. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली गिरगावची ही अनोखी संस्कृती माझ्या स्केचेस द्वारा जिवंत ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.

Brief profile of artist Chitra Vaidya

An avid painter, Chitra Vaidya (born : 1965) likes to explore themes and subjects in a special way so as to bring to life the essence and ethos of her subjects, which have been very diverse as can be seen from her portfolio. Chitra completed her graduate and postgraduate studies from Sir J. J. School of Art, Mumbai and has eleven solo and fifteen group exhibitions at leading galleries to her credit. The range of themes in her exhibitions reflect her active mind and keen spirit of exploration. It is her conviction that the realm of painting should go beyond creating a visual document and should in fact reflect the character of the subject. It is this belief and approach to painting that makes Chitra stand out. She has been a popular art teacher as she enjoys working with children and kindling the creative instincts in them. She has been conducting art workshops for all age groups and has done live painting demonstrations at several educational institutions.

Profile of Chitra Vaidya

Blog posts about artist Chitra Vaidya