X

Login

 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register

F

e

e

d

b

a

c

k

One artwork is added in the cart
One artwork is shortlisted
we accept

कॅनव्हास पेंटिंग व्हिडिओ प्रात्यक्षिक

कॅनव्हास पेंटिंग व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा कॅनव्हास पेंटिंगचा आनंद घ्या. हा पेंटिंग व्हिडिओ खुला आसमानशी निगडीत शालेय विद्यार्थी, कॉलेज युवक व कॉलेज युवती ह्यांच्यासाठी बनविण्यात आला आहे. पालक, शिक्षक व हौशी चित्रकार ह्यांनासुद्धा ह्या पेंटिंग व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल.

 

पेंटिंग व्हिडिओ बद्दल चित्रकार चित्रा वैद्य ह्यांचे निवेदन

 

खुला आसमान स्पर्धेत भाग घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच हौशी कलाकारांना हा पेंटिंग व्हिडीओ उपयुक्त ठरेल. यात मी छोटेसे कॅनव्हास पेंटिंग अॅक्रेलिक रंगात करून दाखवले आहे. माध्यमाची माहिती, रंगवण्याची सुरुवात कशी करावी, विविध ब्रश strokes, पँलेट नाइफ कशी वापरावी इत्यादी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बांबूची झाडे रंगवण्यासाठी warm रंगसंगतीचा वापर केला आहे.

 

अॅक्रेलिक रंग

 

अॅक्रेलिक रंग खूप लवकर वाळतात. हे रंग पाण्यात विरघळतात, परंतु कोरडे असताना पाणी प्रतिरोधक बनतात. आपण हे रंग पाण्यात किंवा अॅक्रेलिक च्या माध्यमात पातळ करून वापरले तर पारदर्शक रंगलेपन करू शकतो. जर याचे जाड रंगलेपन केले तर ऑइल पेंटिंग सारखा परिणाम साधता येतो. हे रंग पेपर, कॅनव्हास, लाकूड, भिंत या सारख्या विविध पृष्ठभागावर वापरता येतात. ह्या कॅनव्हास पेंटिंग व्हिडीओ मध्ये मी छोट्या कॅनव्हास बोर्ड वर अॅक्रेलिक रंग वापरून पेंटिंग केले आहे. असे कॅनव्हास बोर्ड आर्ट मटेरियल च्या दुकानात मिळतात. ते फार महागही नसतात. अॅक्रेलिक रंगाच्या ट्यूब सुद्धा आर्ट मटेरियल च्या दुकानात किंवा स्टेशनरी च्या दुकानात मिळतात. सिन्थेटिक हेअरचे ब्रश आणि पॅलेट knife चा उपयोग करून कॅनव्हास वर रंगलेपन केले आहे.

 

पेंटिंगचा विषय

 

या पेंटिंग चा विषय “बांबू” हा आहे. बांबू हा बांधकामासाठी, औषधे बनवण्यासाठी, अन्नपदार्थांसाठी वापरला जातो. बांबू पासून बासरी बनवतात. बांबू चा आकार आणि त्याची लांब बारीक पाने यांच्या आकारामुळे पेंटिंग साठी आकर्षक रचना तयार होऊ शकतात. मी स्वतः वेगवेगळ्या रंगसंगतीत बांबू ची पेंटिंग केली आहेत. हे पेंटिंग सुरु करताना मी फिकट पिवळ्या रंगाने, फ्लॅट ब्रश वापरून patchy ब्रश स्ट्रोक्स ने कॅनव्हासची पार्श्वभूमी रंगवून घेतली. हा रंग वाळल्यावर, मी गडद रंगाने बांबू चित्रीत केले. बांबू ची सुंदर रचना करण्याकडे माझा कल होता. त्यानंतर टोकदार ब्रश आणि पॅलेट नाइफ वापरून बांबू ची पाने रंगवली. माझ्या मनासारखा परिणाम साधेपर्यंत मी हे पेंटिंग करत राहिले. हे पेंटिंग करताना मला खूप आनंद मिळाला. तुम्हीसुद्धा असे एखादे पेंटिंग करून बघा. तुम्हाला त्यातून नक्कीच आनंद मिळेल. तुमचा अनुभव आमच्याशी जरूर शेअर करा.

 

खुला आसमान निरनिराळे व्हिडीओ तुमच्यासाठी तयार करत राहील. आम्हाला ते तुमच्याशी शेअर करायला नक्कीच आवडेल.

 

 

Share on facebook