X

Login

 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register

F

e

e

d

b

a

c

k

One artwork is added in the cart
One artwork is shortlisted
we accept  
Keywords: Professional Artists, Emerging Artists, Paintings, Children's Art

Mumbai Diary - Anwar on his journey

by Anwar Husain

 

Anwar Husain talks about his journey so far, his feelings and his views in a freewheeling discussion with Milind Sathe.

 

थोडसं माझ्या कलाप्रवासाबद्दल...

 

Mumbai Diary by Anwar Husainबारावी सायन्स करताना अचानक चित्रांचा नाद लागला... फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीमध्ये मन रमेना, निर्णय घेतला... Fine Art करायचं...


पुढच्या पाच वर्षात Art School मध्ये भरपूर प्रयोग केले... त्यांतून मिळाली सतत 'वेगळ काहीतरी' शोधायची उर्मी..


कॉलेज पूर्ण झाल्यावर पुण्यात आलो...

नोकरी न करता, कलाक्षेत्रात मुक्तपणे काम करण्याची आकांक्षा घेवून. पण ते इतकं सहज कुठे होतं..? वास्तवाची जाणीव झाली... मग सुरू झाला struggle ... स्वतःला सिद्ध करून दाखवायचा. काय करता येईल याचा अखंड विचार चालू असायचा. सवाई गंधर्वमध्ये अनेक महान कलावंताच्या मैफीली ऐकताना, त्यांना देहभान हरपून गाताना, वाजवताना पाहात असताना, माझ्या मनात कल्पना आली की आपण या कलावंतांचे वेगवेगळे मूड रंगांमध्ये उतरवू शकतो कॅनव्हासवर आणि मग वेळ न गमवता 'इबादत' ही मालिक कॅनव्हासवर साकारली.


पुढे Indiaart Gallery च्या सहकार्याने ही चित्रे लोकांसमोर आली आणि जो प्रतिसाद लोकांनी मला दिला तो अविस्मरणीय आहे. ह्यातील काही चित्रे. आज US, London, Australia येथील रसिकांच्या Drawing room च्या भिंतींवर आहेत.


ही चित्रे करण्यापूर्वी मी gallery वाल्यांना माझं प्रदर्शन कराल का असं विचारत फिरायचो. आता एका गॅलरीने मला प्रदर्शन करण्याची संधी दिली.


पुढे मी ते प्रदर्शन केलं... प्रचंड प्रतिसाद... माझी एकूण ४ प्रदर्शनं पुण्यात Indiaart gallery ने केली. माझ्या या प्रवासात त्यांची मला फारच मदत झाली.. या काळात चित्ररसिकांमध्ये माझी ओळख निर्माण झाली...


प्रभाव

 

Mumbai Diary by Anwar Husainएक विचार कायमच माझ्यामध्ये सुरु असतो की आपण जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ते अधिकाधिक समृद्ध व्हावे. त्यातून मला तर आनंद मिळतोच नवनिर्मितीचा पण लोकांनाही काही वेगळं पाहिल्याचा आनंद व्हावा. माझ्या डोळ्यांसमोर अशा काही कलावंतांची उदाहरणे नेहमीच असतात. ज्यांना आपापल्या क्षेत्रांतएव्हढ प्रचंड काम करुन ठेवलय की त्याचा आस्वाद घ्यायला हे एक जीवन अपुरे आहे. इतक दर्जेदार काम इतकी विविधता चित्रकारांमध्ये व्हॅनगॉग, त्याच्या चित्रातले भारावून टाकणारे झपाटलेपण, चि्रविषयाशी भिडण्याची तीव्रता, आपल्या सभोवतालाला चित्रबद्ध करून भावना जिवंत करण्याची किमया. त्याच मनस्वी जगणं हे मला नेहमी आकर्षित करतं. तसेच रेंब्रांची अनेक चित्र. विशेषतः त्याची self portraits मला प्रचंड आवडतात. वेगवेगळ्या वयांत केलेली ही चित्रे म्हणजे रेब्रांचे आत्मचरित्रच जणू त्याच्या चित्रातली प्रकाश योजना त्यातून निर्माण होणारे अद्भूत नाट्य याचाही माझ्या चित्रांमध्ये प्रभाव आहे. अशी प्रकाशयोजना माझ्या काही वस्तुचित्रांमध्ये मी वापरून त्यातून होणारे नाट्य पकडण्याचा प्रयत्न केला.

 

याशिवाय पिकासोच्या चित्रातील वैविध्य त्याचे एकाच साच्यात न अडकता सतत प्रयोगशील राहणे. हे प्रेरणादायी आहे. आपल्या भारतीय कलावंतांमध्ये मला हे वैशिष्टय M. F. Husain यांच्या चित्रात आढळतो. विषयांचं प्रचंड वैविध्य. रेषांचा जोमदारपणा रंगवण्याचे झपाटलेपणा कुठेही एकसुरीपणा नाही हे आजकाल दुर्मिळ असणारे महत्त्वाचे वैशिष्टय यामुळे या लोकांकडून प्रेरणा ठेवून आपण आपले काम करत रहावे असे मला वाटते.

 

चित्रकार - आणि चित्ररसिक - दरी

 

मला वाटतं आपल्याकडे चित्र-चित्रकार आणि लोकांच्या मध्ये एक दरी आहे. त्याला दोन्ही बाजू जबाबदार आहेत. चित्रकार समाजाशी फटकून वागतात अशी वस्तुस्थिती आहे. याच एक कारण मला वाटतय चित्रकाराच्या कलाकृतींचा सामान्यांशी फारसा संपर्कच होत नाही. चित्रकाराच्या स्टुडिओमधून ती चित्रे गॅलरीमध्ये प्रदर्शित होतात आणि तेथून फार तर कुणा रसिकाच्या घराच्या भिंतीवर. या प्रवासात फारच कमी लोकांशी चित्रांचा संपर्क येतो ही गोष्ट चित्रकलेच्या दृष्टीने मला वाटत हानिकारक ठरत आहे. शिवाय आपल्याकडचे लोकही अगदी उच्चशिक्षीत. स्वतः कवी, लेखक असणारे चित्र मग ते अगदी साधे पोर्टेट, लँडस्केप किंवा इतर वास्तववादी शैलीतले ही असु दे, त्यावर प्रतिक्रिया देवू शकत नाहीत. आम्हाला चित्रातले काही कळत नाही असे बहुतांश लोकांचे म्हणणे असते. मग अमुर्त आणि आधुनिक शैलीच्या चित्रांची तर बातच नको. खरं तर माझ्या मते हे लोक एक तर चित्र ज्या पद्धतीने संवेदनशीलतेने पाहायला पाहीजे तसे पाहत नाहीत. वरवर न्याहाळत असतात. त्यामुळे त्यांची दृष्टी तयार होत नाही चित्र पाहण्यासाठीची आणि चित्रकारही काही अंशी असे वातावरण निर्माण करण्यास मदत करत असतो. स्वतःशिवाय इतर कुणालाही त्या चित्रामध्ये काय रंगवलय याचा संदर्भ कळू नये अशा अनाकनीय कलाकृती निर्माण करणं म्हणजे उच्च दर्जाची कला असा भ्रम स्वतः भोवती आणि रसिकांच्यात पैदा करतो. त्यामुळे रसिकही अशा कलाकृतींपासून दूरच राहतात. चित्र पाहणा-यामध्ये आणि चित्रकृतीमध्ये एक बंध - एक धागा निर्माण झाला पाहिजे तरच पाहणारा चित्रामध्ये खेचला जावून त्याच्या मनात त्या चित्राला स्थान मिळू शकेल.

 

कलाशिक्षण

 

Mumbai Diary by Anwar Husainमाझ्या मते आपल्याकडे आर्ट स्कूलमध्ये आजही तो जुणापुराणाच अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये काळानुरूप बदल घडवायला हवेत. होतय काय, की मोठ्या शहरांमध्ये ठीक आहे अनेक आर्ट गॅलरीज असतात. अनेक कलावंतही असतात. अनेक नवनवे कलाप्रकार वेगवेगळे प्रयोग, इतर कलाप्रकारातील प्रयोग त्यांची प्रगती आधुनिक विचार यामुळे एक प्रयोगशील आधुनिक विचारांचे वातावरण असते. त्यामुळे अशा शहरातील कला शाखेचे विद्यार्थी हे नियमित अनुभवू शकतात आणि त्यातून त्यांचे विचार प्रगल्भ, प्रयोगशील बनत जातात, कलेचा विकास घडतो. पण छोट्या किंवा कलेच्या दृष्टीने प्रगतीशील अशा शहरांपासून लांबच्या गावांमधून अशी कोणतीही सोय नसते आणि अभ्यासक्रमही तो जुनाच त्यामुळे विद्यार्थी ठराविक साच्यातून बाहेरच येवू शकत नाही, त्यांचे काम मग जागतिक कलेच्या पार्श्वभूमीवर अगदीच जुन्या काळातले वाटते. यासाठी अभ्यासक्रमामध्ये नवनवीन माध्यम संवादसाधने यांचा वापर करून जगात सध्या कलेची काय स्थिती आहे. काय प्रयोग होतायत याची जाणिवपूर्वक दखल घ्यायला हवी. तरच कलाशिक्षणाचा योग्य उपयोग होईल.

 

आजपर्यंच्या या चित्रप्रवासात अनेक विषय हाताळले वेगवेगळ्या विषयांनी भुरळ घातली त्या-त्या वेळी ते ते विषय कॅनव्हासवर उतरत गेले. अनेक चित्रांच्या मालिका तयार होत गेल्या. काही विषय मनात खोलवर रूतलेले असतात त्यातून अनेक चित्रं अलगद निर्माण होतात. केलेली सर्वच चित्रे त्या-त्या वेळेला आवडत असतात पण आपण जेव्हा थोड्या कालानंतर मागे वळून बघतो त्यावेळी काही विषयांची त्यातून निर्माण झालेल्या चित्रांशी आपला भावबंध अजूनही तितकाच ताजा वाटतो. ती चित्रं मनाच्या फारच जवळची वाटतात. मी सुरवातीला Nastalgia नावाची एक चित्रमालिका केलेली. त्यातील चित्रं करताना मला फार आनंद मिळाला. त्यात माझ्या बालपणीच्या आठवणी. माझ्या गावातले जुने वाडे, राजवाडे, हवेल्या इ.गोष्टी ज्या मला नेहमी खुणावत असतात. त्या चित्रित केल्या होत्या. त्यानंतर अशाच आठवणींनी भारावलेली माझी कपाटांच्या (Almiras) चित्रांची मालिका मला फारच आनंद देवून गेली. गोव्याची चित्रे सुद्धा मला आज पाहताना आनंद होतो. गोव्याची चित्रमालिका पुन्हा करण्याची माझी इच्छा आहे. वेगळ्या पद्धतीने तसंच मुंबईची चित्रसुद्धा पुनःपुन्हा करावीशी वाटतात. वेगवेगळ्या शहरांच्या चित्रात्मक आत्मकथा असा प्रयोगही केलेला तो पेंटींग्ज, स्केचेस अशा माध्यमातून चालू आहेत.

 

आजपर्यंतच्या आवडलेल्या चित्रमालिका


इथून पुढच्या काळात मला ब-याच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. जसे शहरं, लोक, वेगवेगळ्या लोकांचे राहणीमान, त्यांचं दैनंदिन जीवन, सर्व काही बारकाईने रेखाटण्याची इच्छा आहे. त्यातून स्केचेस, चित्र, अस काही होत राहील.

 

Abstract


Mumbai Diary by Anwar Husainअब्स्ट्रॅक्ट चित्र करण्यासाठी मला तरी असं वाटत नाही की त्यासाठी तुम्ही फिगरेटीव्ह आधी केलच पाहिजे हे कंपल्सरी नाही. व्यक्त होण्याच्या प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असतात. फिगरेटीव्ह कमी दर्जाचं आणि अमूर्त चित्र श्रेष्ठ असलेही काही मला मान्य नाही आणि आजकाल अमूर्त चित्रांना अध्यात्मिक अर्थ चिकटवले जातात तेही योग्य नाही. फारच कमी अमुर्त चित्रकार गंभीरपणे आपल्या वाटेने चाललेले दिसतात. बाकी बरेचसे एक फॅशन म्हणून अनेक गैरसमज डोक्यात ठेवून. अमूर्त चित्रं करताना दिसतात.

 

अगदी गांर्भीयाने केलेली प्रामाणिक असणारी अमूर्त चित्रे मला नक्कीच भावतात.


मला आवडलेली चित्रं


Vincent's Bedroom in Arles

All the self portraits by Rembrandts

Between the spider and the lamp by MF Husain

The other shore- by Prabhakar Barve

Hindu Girl. Portrait by A.X. Trindade

 

Any persons you wish to acknowledge for having contributed to your journey


Mumbai Diary by Anwar Husainआजवरच्या या प्रवासात मला माझ्या चित्रांमध्ये रस असणा-या काही मित्रांची, हितचिंतकांची वेळोवेळी फारच मोलाची साथ मिळाली आहे. अगदी प्रख्यात अभिनेते श्री. नाना पाटेकर, यांच्या काही शब्दांच्या जादूमुळे माझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं. माझ्या काही चित्रांतून त्यांना आनंद मिळाला. त्यांनी स्वतःहून मला शोधून काढलं हे सगळं अद्भूत आहे.


मी जेव्हा Diploma होवून बाहेर पडलो, कामाच्या शोधात, मला प्रदर्शन करायचं होतं. पण ब-याच ठिकाणाहून निराशाच हाती लागत होती. त्याच दरम्यान मी indiaart.com हे कलाविषयक संकेतस्थळाचे निर्माते श्री. मिलिंद साठे यांच्या संपर्कात आलो. त्यांनी चित्रे पाहिली. त्यांना आवडती असावीत. त्यांनी लगेचच त्यांच्या एका ग्रुप शोमध्ये Hotel Holiday Inn च्या गॅलरीमध्ये माझी काही चित्रे प्रदर्शित केली त्यांना छान प्रतिसाद मिळाला. चित्रं विकली गेली. माझ्यासाठी हा सुखद अनुभव होता. त्याप्रदर्शनानंतर श्री. मिलिंद साठे सरांनी माझी अनेक वैयक्तिक प्रदर्शनं केली. या दरम्यान त्यांचं अनेक विषयांमध्ये मला मार्गदर्शन लाभलं. अनेक चर्चांमधून काही नवीन घडत गेलं. माझी चित्रं वेबसाईटच्या आणि गॅलरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचं श्रेय त्यांचंच आहे. त्यांच्या माध्यमातून जगभरातल्या अनेक रसिकांच्या घराघरात ही चित्रं पोहोचली. त्यातून मला आनंद तर मिळालाच पण कलावंताला जे आर्थिक स्थैर्य गरजेचं असतं तेही ब-याच प्रमाणात मिळालं.


इथून पुढच्या काळातही त्यांचं मार्गदर्शन मला मिळत राहीलच.


काही वर्षांपूर्वी मला माझं काम करण्यासाठी जागेची गरज होती. मनासारखी जागा मिळत नव्हती. त्यामुळे मी डिस्टर्ब होतो. बरीच शोधाशोध केली...


आमच्या अपार्टमेंट शेजारी मराठीतील प्रख्यात कवयित्री आणि रेखाटनकार प्रा. शैला सायनाकर यांनी एक रो-बंगलो खरेदी केला होता. दुर्दैवाने त्या घरामध्ये त्या फार काळ नाही राहू शकल्या. त्यांच्यानंतर ते घर मोकळंच पडून होतं. सर्व सायनाकर फॅमिलीशी आमचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे माझी ही जागेसाठीची शोधाशोध मॅडमचे बंधू प्रा.श्री. विश्वास सायनाकर यांच्यापर्यंत गेली. त्यांनी कोणताही विचार न करता मला मॅडमच्या घराची चावी सोपवली. काहीही भाडं नाही बाकी कुठलाही खर्च नाही. तू फक्त चित्रं काढत जा तिथं राहून त्यातून शैला मॅडमच्या आठवणी राहतील.


पुढे जवळजवळ ३ ते ४ वर्षे मी ते घर वापरत होतो. यासाठी संपूर्ण सायनाकर फॅमिलीचा ऋणात राहीन मी कायमचा....


आणि अर्थातच माझी पूर्ण फॅमिली. मला नेहमीच कधीही आणि कसलीही मदत करायला तयार असणारे माझे आई-वडील, यांच्या मदतीशिवाय मी हा प्रवास करूच शकलो नसतो...