हिंदी
English

 

 

विषय : बाह्य आवकाश (अंतरिक्ष)

पुरातन कालापासून आदिमानवाचे आकाशातील अद्भूत दृश्यांचा साक्षीदार आहे. आपल्या ग्रहाच्या पलिकडे म्हणजे अवकाशात किंवा अंतरिक्षात काय असावे याची उत्सुकता मानवाला काव्यनिर्मिती तसेच तारे आणि ग्रहांच्या हालचालीमागील शास्त्रीय तत्वे शोधण्यास व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास उद्युक्त करते.

फक्त ५० वर्षेपूर्वी मानव खरोखरच अवकाशामध्ये गेला. तेव्हा पासून विलक्षण प्रगती झाली आहे. मानव चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला आहे. तर अंतरिक्षयानाने याहूनही लांब अंतरावर प्रवास केला आहे. शक्तिमान कॅमेरा आणि इतर संवेदनक्षम तंत्रज्ञानाला धन्यवाद आपल्याला आता विश्व आणि अवकाशाचे यापूर्वीपेक्षा अधिक आकलन झाले आहे. अवकाश आकलनाविषयीच्या आपल्या सीमा आता दर दिवशी विस्तृत होत आहेत.

खुला आसमान, मुलांनी आणि युवकांनी अंतरिक्षातील अद्भूत जगाचा त्यांच्या सृजनशील अभिव्यक्ती मधून शोध घ्यावा असा आग्रह करते. ते तारे, ग्रह, आकाशगंगा, स्पेस मिशन्स, अग्निबाण आणि आकलनापलिकडे जाऊन चित्रे रंगवू शकतात शेवटी असे म्हणतात की इतर कोणी बघू शकत नाहीत ते कलाकार बघतात.

मुले (५ ते १५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे व रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, कोलाज सबमिट करु शकतात. युवक (1५ ते 2५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्‍यंगचित्रे, विनोदी, कला, पोस्टर्स, डूडल्स, पेपरवरील ३डी कला, छायाचित्रे (कॅमेरा व सेल फोनवरील), डिजीटल कला (डिजीटल साहित्य वापरुन केलेली कुठलीही कलाकृती) सबमिट करु शकतात.

प्रत्येक कलाकृती सबमिट करताना खालील माहिती दिली आहे याची खात्री करुन द्या. शार्षक, वर्णन (कोणत्‍्याही भाषेत) कलाकृतीचे माप आणि माध्यम.

 

Khula Aasmaan - Outer Space
खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.