हिंदी
English

 

 

विषय : खुला

खुला आसमान निर्बंध घालण्यावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक मुलाने आणि युवकाने जिज्ञासू व सर्जनशील असावे, स्वत: न घाबरता व्यक्त व्हावे आणि आपला परीसर व माणसांशी माणूसकीने वागावे, संवेदनशील असावे यासाठी खुला आसमान प्रोत्साहन देऊ इच्छिते.

सुचविलेल्या विषयाशिवाय एखाद्या बालकलाकार किंवा युवा कलाकाराला कुठल्याही इतर विषयावर काम करायचे असल्यास खुला आसमान ते आनंदाने स्वीकारेल. यामध्ये खुला आसमानच्या आधीच्या स्पर्धेतील विषय जसे की मी आणि माझा सेल्फी (फोटो), मित्रमैत्रिणींबरोबर मौज, माझा आवडता चित्रपट, आगगाडीचा संस्मरणीय प्रवास, सर्वांसाठी शिक्षण, माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर, रेल्वेचे आकर्षण, माझा अंतरिक्ष प्रवास, पाणी म्हणजे जीवन, स्वच्छ भारत, झाडे वाचवा – झाडे वाढवा, दिव्यांचा सण इ. असू शकतील. खुला आसमान आग्रह करते की या श्रेणीमध्ये मुले किंवा युवकांनी त्यांच्या आवडत्या कुठल्याही विषयावर कलाकृती सबमिट कराव्यात.

मुले (५ ते १५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे व रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, कोलाज सबमिट करु शकतात. युवक (१५ ते 2५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्‍यंगचित्रे, विनोदी, कला, पोस्टर्स, डूडल्स, पेपरवरील ३डी कला, छायाचित्रे (कॅमेरा व सेल फोनवरील), डिजीटल कला (डिजीटल साहित्य वापरुन केलेली कुठलीही कलाकृती) सबमिट करु शकतात.

प्रत्येक कलाकृती सबमिट करताना खालील माहिती दिली आहे याची खात्री करुन द्या. शार्षक, वर्णन (कोणत्‍्याही भाषेत) कलाकृतीचे माप आणि माध्यम.

 

Khula Aasmaan - Open
खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.