हिंदी
English

 

 

खुला आसमान प्रदर्शन
पदकप्राप्‍त पुरस्कार मिळालेल्‍या चित्रांचे प्रदर्शन
इंडिया आर्ट गॅलरी, पुणे-२१ जुलै ते १२ ऑगस्ट २०१८
Khula Aasmaan - Exhibition at Nehru Centre, Mumbai - October 2017

खुला आसमान हे मुलांच्‍या सर्जनशील अविष्कारासाठी विनामूल्‍य व्‍यासपीठ आहे. खुला आसमान मुलांसाठी स्‍पर्धा आयोजन करते. प्रत्‍येक तीन महिन्‍यांनी, निवडक चित्रांची यादी केली जाते आणि खुला आसमान प्रत्‍येक निवडलेल्‍या मुलासाठी स्‍वतंत्र वेब पेज तयार करते. हे स्‍वतंत्र वेबपेज पुढील तीन वर्षांसाठी संभाळले जाते. निवडलेल्‍या गेलेल्‍या चित्रांचे पुन्‍हा दुसऱ्या फेरीत जजिंग करुन पदके ठरवली जातात.

 

खुला आसमान तिमाही स्‍पर्धेत ज्‍या पुण्यातील मुलांना सुवर्ण, रौप्‍य व कांस्य पदके मिळाली आहेत, त्‍या मुलांच्‍या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. खुला आसमान संपूर्ण भारतभर पदक प्राप्‍त चित्रांचे प्रदर्शन करेल.

 

खुला आसमान हे प्रदर्शन बघण्यासाठी शाळेतील मुले, युवक, पालक आणि शिक्षक यांना आमंत्रित करते. हे प्रदर्शन बघुन मुलांना नक्कीच अभिव्‍यक्‍त होण्याची प्रेरणा मिळेल. गॅलरीत येऊन, चित्रे काढून व रंगवून खुला आसमानच्‍या चालू स्‍पर्धेत ते चित्र समाविष्ट करता येऊ शकेल.

 

प्रदर्शन : २१ जुलै ते १२ ऑक्‍टोबर २०१८ 2018 वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत. | विनामूल्‍य प्रवेश

स्‍थळ : इंडिया आर्ट गॅलरी
‘लावण्य’ प्‍लॉट नं. ३०, भोसले नगर,
ऑफ रेंज हिल्‍स रोड, पुणे-४११००७

 

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.