हिंदी
English

 

 

खुला आसमान स्पर्धा - पदक, सन्माननीय उल्लेख, पुरस्कार

खुला आसमान

खुला आसमानच्या प्रत्येक तिमाही स्पर्धेतून शॉर्टलिस्ट तयार केली जाते. शॉर्टलिस्ट झालेल्या मूळ कलाकृती व प्रवेशिकांमधून पदके (सुवर्णपदक,रौप्यपदक, कांस्यपदक), सन्माननीय उल्लेख, पुरस्कार / बक्षिसे जाहीर केली जातात. ही प्रक्रिया प्रत्येक तिमाहीत केली जाते.

पदके व प्रशस्तिपत्रे यांच्‍या सौजन्‍याने (प्रायोजित केली आहेत)

खुला आसमान मध्ये सहभागी व्‍हा आणि लडाकची सहल जिंका

खुला आसमान व टायरमार्क​, जे लडाकच्‍या खास सहलीसाठी प्रसिद्ध आहेत. यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने एक विलक्षण पारितोषिक जाहीर करत आहेत. प्रत्‍येक तीन महिन्‍यात खुला आसमानमधील एक पदक प्राप्‍त विजेता टायरमार्क बरोबर लडाकला १० दिवसांचा प्रवास करेल. याशिवाय त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍य ५०% सवलतीत या प्रवासात सहभागी होऊ शकतील.

खुला आसमान मध्ये सहभागी व्‍हा आणि रणथंबोरची सहल जिंका

खुला आसमान आणि जंगल लोअर यांना प्रत्‍येक तीन महिन्‍यात रणथंबोर ची सहल पुरस्‍कार रूपाने जाहिर करण्यास आनंद होत आहे. रणथंबोर नॅशनल पार्क हे तेथील वाघांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय जंगली प्राण्यांमधील भव्‍य शिकार पहाण्यासाठी देशातले हे सर्वा​त चांगले ठिकाण आहे. या नॅशनल पार्क​ची स्‍वाभाविक रचना ही वाघ, चित्ते पट्टेरी तरस, सांबर हरीण, चितल, नीलगाय, लालसर शेपटीचा ससा, भारतीय जंगली अस्‍वल, भारतीय रक्‍तशोषक वटवाघूळ (Indian false Vampire), भारतीय कोल्‍हे, मुंगूस, दलदलीतील चिडखोर मगरी, वाळवंटातील मॉनिटर पाली याशिवाय ३०० पक्षांच्‍या विविध जाती यांच्‍यासाठी घरासारखी आहे.

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.