Indiaart Home

Khula Aasmaan

About Khula Aasmaan Why Khula Aasmaan What is Khula Aasmaan Comments & Testimonials Entries from locations Recognition Downloads

Art Contest

Regular Contest World of Mahatma Gandhi Contest Contest Results Prizes Shortlisted Child Artists Shortlisted Young Artists

Contest Themes

Videos & Audios

Videos Audios

Workshops, Exhibitions & Events

Other

Art on Postcard Articles & Write ups Blogs Khula Aasmaan Science Khula Aasmaan Photography

Reach Us

Home » Khula Aasmaan » Khula Aasmaan Science » Little Scientists » Essay by Sanika Jagtap

Kitchen Science, essay by Sanika Jagtap

Shortlisted science essay from Khula Aasmaan children’s essay contest

essay by Sanika Jagtap (born : 2005), Prerana Madhymik Vidyalay, Pimpri-Chinchwad, Maharashtra

This science essay is a shortlisted essay from Science Day 2019 essay competition for children. This essay contest was organised by Khula Aasmaan and Science Park, Pune.

स्वयंपाकघर ही एक प्रयेगशाळाच आहे. स्वयंपाकघर हे रसायनशास्त्राने बनलेलं आहे. आपलं शरीर किंवा संपूर्ण विश्‍व अणू-रेणूने बनलेलं आहे. स्वयंपाकघरातील बर्‍याचशा गोष्टी विज्ञानाशी निगडित आहेत. स्वयंपाकघरात आपल्याला पाणी हे महत्त्वाचं असतं. पाणी जर आपण तांब्याच्या भांड्यातून पिल्यास त्यातील घटक आपल्या शरीरात जातात. त्यापासून आपल्या शरीराला उपयुक्त घटक मिळतात. तसेच लहान मुलांना चांदीच्या पेल्यातून किंवा भांड्यातून पाणी पाजतात. यामध्येही शास्त्रीय कारण आहे. कारण लहान मुलांना लगेच बाहेरचे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांदीमध्ये काही गुणधर्म असल्यामुळे लहान मुलांना आजार होण्याची शक्यता कमी असते.

पिण्यासाठी भांडी असतात, तसेच अन्न शिजवण्यासाठीही काही उपयुक्त भांडी असतात. पण आपण जी पिण्यासाठी भांडी वापरतो ती शेगडीवर ठेवण्यासारखी नसतात.आपल्या शरीरामध्ये लोह जाण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करावा. ज्या व्यक्तीच्या रक्तामध्ये एच.बी.चे प्रमाण कमी असते त्यांना लोखंडाच्या भांड्यातून अन्न खाणे उपयुक्त असते. तसेच लोखंडाच्या भांड्यात जास्तवेळ अन्न ठेवू नये. त्यातील काही घटक आपल्या शरीरासाठी घातक असतात. जास्त वेळ त्यामध्ये भाजी ठेवल्यास त्याला काळा रंग येतो. त्यामुळे काहीजणांना ते खाऊशी वाटत नाही. त्याप्रमाणे लोखंडाच्या भांड्याला दर महिन्याला कल्हई लावायची असते. कारण आपण भांड्यामध्ये आंबट पदार्थ केल्यास त्यामध्ये काही विषारी घटक निर्माण होतात. व ते अन्नामध्ये मिसळू शकतात. त्यामुळे दर महिन्याला लोखंडाच्या भांड्याला कल्हई लावणे आवश्यक आहे.

स्वयंपाकघरात वर्तनमानपत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तो वापर टाळावा. कारण त्यामधील शाई आपल्या पोटात जाते व ते आपल्या आरोग्यास घातक आहे. बर्‍याचजणांना सयवक असते की चपाती पेपरमध्ये देण्याची, शक्यतो ती टाळावी. पूर्ण प्लेन पांढरा कागदाचा वापर करावा. स्वयंपाकघर म्हटले की काही वस्तू इथेच ठेवायच्या, दुसरीकडे नाही. त्यामागेही काहीतरी शास्त्रीय कारण असते. कारण प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय कारण हे असतेच. घरामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. त्यामुळे घर प्रसन्न होते. कित्येकजण घरामध्ये एखादे फळ अडकवतात आणि ते जर नासले तर म्हणतात घराला नजर लागली. पण ते एक फळ आहे. नासणारच ! हे कुणाच्या लक्षात येत नाही. घरामध्ये कित्येक गोष्टी रसायनशास्त्राच्या असतात लिंबू हे एक आम्ल आहे. परंतु ते जास्त घातक नाही. कारण ते आपण खातो. चक्कर आल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर लिंबूपाणी देतात. लिंबाचा उपयोग खूप गोष्टींमध्ये होतो. आपण भांडी किंवा कपडे चांगले स्वच्छ निघावे म्हणून लिंबाचा वापर करतो. कारण त्यामध्ये आम्ल असते. पूर्वी साबण वगैरे काही नव्हते तेव्हा लिंबाचा वापर केला जायचा. सर्व गोष्टी पूर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत. त्यावर वैज्ञानिक शोध लावत आले आहेत. चांदीच्या आणि तांब्याच्या भांड्यातून पिण्यासाठी ते सहा-सात तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवायचे असते. तरच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.

स्वयंपाकघरात दूध असते. आपल्या शरीरासाठी दूध हे खूप चांगले आहे. सकाळी दूध पिल्यास त्यातील प्रथिने आपल्या पोटात गेल्यास स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो. कळत-नकळत आपण प्रत्येक गोष्टी विज्ञानाच्या करत असतो.

Related Links :

Science Day essay contest results

Shortlisted essays from Science Day essay competition

Blog post - Khula Aasmaan Science is now live

Khula Aasmaan Science Contest Themes

Participate in Khula Aasmaan Science Contest