X

Login

 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register

F

e

e

d

b

a

c

k

One artwork is added in the cart
One artwork is shortlisted
we accept

Sant Tukaram (संत तुकाराम) painting

Videos

Sant Tukaram (संत तुकाराम) painting or Tukaram Maharaj painting by Jagdeesh Krushna Lahare (class 8) from Gonde ashramshala, Dist. Palghar (जगदीश कृष्णा लहारे, इयत्ता आठवी, गोंदे आश्रमशाळा, जि. पालघर)


Listen to Jagdeesh Krushna Lahare in conversation with Milind Sathe of Khula Aasman. Jagdeesh not only talks about this painting but also sings.

 

 

Audio only

 

संत तुकाराम (तुकोबा) - वारकरी संत

संत तुकाराम( तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

 

अभंग

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते.


Tukaram, also referred to as Sant Tukaram, Bhakta Tukaram, Tukaram Maharaj, Tukoba and Tukobaraya, was a 17th-century Hindu poet and sant of the Bhakti movement in Maharashtra, India. He was part of the egalitarian, personalized Varkari devotionalism tradition. Tukaram is best known for his devotional poetry called Abhanga and community-oriented worship with spiritual songs known as kirtans. His poetry was devoted to Vitthala or Vithoba, an avatar of Hindu god Vishnu.
(source : Wikipedia)

 

Silver medal for this painting

This painting won a silver medal in Khula Aasmaan art competition for children and painting contest for young adults for October to December 2018. Listen to child artist Jagdeesh talk to Milind Sathe of Khula Aasmaan about this painting as well as sing.

 

See details of this painting

See other paintings by Jagdeesh Krushna Lahare

 

Listen to other children and young adults talk about their paintings :

These paintings are medal winners, honorable mentions and shortlisted paintings from Khula Aasmaan painting contest for children and art contest for college students.


  • Doctor painting by Shilpa Dombare (class 9) - winner of bronze medal in children’s art competition by Khula Aasmaan
  • Holi painting shows Festival of Holi - bronze medal in painting contest for children by Khula Aasmaan for January to March 2019
  • Lord Jagannath painting by Bhaiya Sinha (class 8) - shortlisted in children’s painting competition by Khula Aasmaan for April to June 2019
  • Meera painting as collage art - silver medal in art contest by Khula Aasmaan for April to June 2019
  • Rainbow painting by Anjana Janu Bhavar (class 9) - honorable mention in painting competition for children by Khula Aasmaan for October to December 2018
  • Sant Tukaram painting (संत तुकाराम) - silver medal in art competition for children by Khula Aasmaan for October to December 2018
  • Zorse painting (zebroid painting) by Gautham (class 1) - shortlisted in children’s art competition by Khula Aasmaan for April to June 2019
  •  

    Share on facebook