हिंदी
English

 

 

विषय : इतिहास आणि वारसा

आपला भूतकाळ जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. मानवाची उत्क्रांती, समाज कसा बदलला, राज्ये आणि राजवंश यांनी विशाल भूमीवर कसे राज्य केले आणि त्यांची सत्ता टिकवण्यासाठी कशी युद्धे केली. धर्मांचा अनेक शतके विविध गोष्टींवर कसा प्रभाव पडला हे जाणून घेणे नेहमीच आकर्षक असते. इतिहास नेहमीच त्याच्या दृश्य खुणा मागे ठेवत असतो. या खुणा आपल्याला खंडहर, उत्खननात सापडलेल्या वस्तू, किल्ले, राजवाडे, मंदिरे, गिरीजागृहे, मशिदी आणि इतर वारसा संरचनेत दिसून येतात.

अशा ऐतिहासिक आणि वारसा असलेल्या ठिकाणांना भेट देणे म्हणजे एक आकर्षक अनुभव असतो. हा अनुभव आपले भूतकाळाचे ज्ञान समृद्ध करतो. आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील दुवा ओळखण्याची अंर्तदृष्टी व आपल्याला भविष्यकाळासाठी मोलाची शिकवण आपल्याला यातून मिळते.

खुला आसमान मुलांना आणि युवकांना इतिहास आणि वारसा ठिकाणांना भेट देण्यास आणि तुमच्या कलाकृती खुला आसमान मध्ये सबमिट करण्याची आग्रही विनंती करते.

मुले (५ ते १५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे व रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, कोलाज सबमिट करु शकतात. युवक (१५ ते 2५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्‍यंगचित्रे, विनोदी, कला, पोस्टर्स, डूडल्स, पेपरवरील ३डी कला, छायाचित्रे (कॅमेरा व सेल फोनवरील), डिजीटल कला (डिजीटल साहित्य वापरुन केलेली कुठलीही कलाकृती) सबमिट करु शकतात.

प्रत्येक कलाकृती सबमिट करताना खालील माहिती दिली आहे याची खात्री करुन द्या : शार्षक, वर्णन (कोणत्‍्याही भाषेत) कलाकृतीचे माप आणि माध्यम.

 

 

Khula Aasmaan - History and Heritage
खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.