हिंदी
English

 

 

पोस्टकार्ड वरील पेन्टिंग, डूडल, चित्र, कार्टून स्पर्धा

खुला आसमान

"पोस्टकार्ड वरील कला" मध्ये सहभाग घेण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे आणि इतर माहिती :

  • पेन्टिंग, स्केच, डूडल, चित्र, कला, कार्टून, व्यंगचित्र करण्यासाठी पोस्टकार्डची एक संपूर्ण बाजू वापरा.
  • आपल्या आवडीचे कोणतेही माध्यम वापरा - पेन्सिल, पेन व शाई, पेस्टल, क्रेयॉन, स्केच पेन, जेल पेन, बॉल पेन, पोस्टर रंग, अॅक्रेलिक रंग, वॉटर कलर्स
  • पोस्टकार्डच्या दुसऱ्या बाजूला, आपले नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि आपल्या शाळेच्या नावासह संपर्क क्रमांक लिहा. शीर्षक, वापरलेले माध्यम आणि आपल्या कलाकृतीचे संक्षिप्त वर्णन देखील लिहा.
  • हे पोस्ट कार्ड पाकिटात घालून खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्ट करा. आपण पाकिटामध्ये पोस्ट कार्ड घातल्यानंतर पाकिटावर 5 रुपये मुद्रांक लावा. पाकिट बंद करा आणि पोस्टात टाका.
  • पोस्टकार्ड् पाकिटामध्ये न घालता पाठवू नका. त्याचे नुकसान होऊ शकते. पाकिटाशिवाय पाठविलेले कोणतेही पोस्टकार्ड स्वीकारले जाणार नाही.
  • एका पाकिटातुन एका पेक्षा जास्त पोस्टकार्डस पाठविता येतील. त्यासाठी योग्य मूल्याचे मुद्रांक लावावे.
  • स्पर्धेसाठी पाठविलेली पोस्टकार्डस खुला आसमान ची मालमत्ता बनतील व परत दिली जाणार नाहीत.
  • खुला आसमान हा व्यावसायिक उपक्रम नाही. खुला आसमान कडे आलेली पोस्टकार्ड विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. खुला आसमान मुले, मुली, युवक व युवती ह्यांच्यातील सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा उपक्रम आहे.
  • पोस्टकार्ड वरती केलेल्या निवडक कलाकृती आमच्या वेबसाइटवर "पोस्टकार्ड वरील कला" विभागामध्ये प्रदर्शित केले जाईल.
  • खुला आसमान वेळोवेळी विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनांमध्ये निवडक पोस्टकार्ड्स प्रदर्शित करेल.
  • "आर्ट ऑन पोस्टकार्ड" किंवा “पोस्टकार्ड वरील कला” मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान मुले, मुली, युवक व युवती ह्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी खुला आसमान वचनबद्ध आहे.
  • "आर्ट ऑन पोस्टकार्ड" या उपक्रमाखाली पोस्टकार्ड पाठविलेल्या निवडक बाल कलाकार व युवा कलाकार यांच्यासाठी खुला आसमान समर्पित वेब पृष्ठ तयार करेल.

खुला आसमान आपल्या पोस्टकार्ड वरील सुंदर कलाकृतींची प्रतीक्षा करत आहे.

पोस्टकार्डवर कला पाठविण्यासाठी पत्ता :

खुला आसमान
c/o आर्ट इंडिया फाउंडेशन
"गायत्री"
६१/९, युनाइटेड वेस्टर्न हाऊसिंग सोसायटी
कर्वेनगर, विठ्ठल मंदिराच्या विरुद्ध पुणे ४११०५२, महाराष्ट्र, भारत

 

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.